आरटीएस महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यातील पात्र नागरिकांना राज्य शासनाने देऊ केलेल्या सार्वजनिक सेवा पारदर्शक पद्धतीने आणि वेळेवर प्राप्त व्हाव्यात, या उद्देशाने आरटीएस महाराष्ट्र हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करणे आणि त्या अर्जाच्या सद्यस्थितीचा मागोवा घेणे वापरकर्त्याला सहज शक्य आहे.
या ॲपची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -
- महाराष्ट्र राज्य शासनाच्या विभागांची यादी उपलब्ध
- प्रत्येक विभागातर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांची यादी उपलब्ध
- प्रत्येक सेवेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि संपर्क तपशील पाहू शकता
- सेवांच्या ऑनलाइन उपलब्धतेचे फायदे पाहू शकता
- बारकोड वापरून प्राप्त प्रमाणपत्र सत्यापित करता येते
- अर्ज तपशील वापरून वैयक्तिक अर्जाची सद्यस्थिती तपासणे शक्य

