स्मार्ट शहरे म्हणून विकसित करण्यासाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील निवडक शहरांमध्ये मजबूत आणि आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पांतर्गत या निवडक शहरांमध्ये विविध उपयुक्त आणि लोकोपयोगी उपक्रम राबवून तिथल्या आर्थिक विकासाला चालना देणे, नागरिकांचे जीवनमान सुधारणे आणि एकूणच नागरिकांच्या हिताला चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या प्रयत्नांच्या परिणामी नागपूर आणि नाशिक ही शहरे आता पर्यावरणपूरक, अत्याधुनिक आणि शिक्षण-केंद्रित शहरे बनण्याच्या दिशेने अग्रेसर आहेत. या प्रकल्पांतर्गत स्वच्छ, हरीत, सुरक्षित आणि सर्वसमावेशक वातावरण तयार करण्यासाठी शासन, व्यवसाय, नागरिक आणि ठिकाणे यांना परस्परांशी डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी शहरव्यापी नेटवर्क विकसित करणे, देखरेख व्यवस्थेत सुधारणा, स्मार्ट कचरा व्यवस्थापन लागू करणे, पार्किंगचे उत्तम व्यवस्थापन करणे आणि पर्यावरणीय सेन्सर वापरणे असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबविले जात आहेत.
हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.