नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या उपक्रमांचे संशोधन, विकसन आणि अंमलबजावणी करण्यासाठी उत्कृष्टता केंद्र विकसित करणे.
महाराष्ट्र राज्यात हाती घेतलेल्या विकास कार्यक्रमांच्या तांत्रिक गरजा पूर्ण करण्यासाठी एंड-टू-एंड आयसीटी सोल्यूशन्स प्रदान करणे, नियोजन ते खरेदी, रचना आणि विकसन तसेच ई-प्रशासन आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संबंधी उपक्रमांची अंमलबजावणी करणे.
औद्योगिक भागीदारी आणि सहकार्याद्वारे तंत्रज्ञान आणि सेवा वितरणातील नाविन्यतेला चालना देण्यासाठी तसेच सार्वजनिक सेवा वितरण आणि शासकीय प्रशासनाच्या क्षेत्रात यशस्वी संकल्पनांचा समावेश असलेल्या पथदर्शी प्रकल्पांसाठी सहायक (सुविधा प्रदाता) म्हणून काम करणे.
'स्मार्ट शहरे', 'डिजिटल व्हिलेज', 'भारतनेट', 'डिजिटल इंडिया', भौगोलिक माहिती प्रणाली, आणि तत्सम प्रकल्प तसेच भारत सरकारने हाती घेतलेल्या कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्प विकसित करण्यासाठी धोरणे, मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रक्रिया तयार करणे, त्यांवर अंमलबजावणी करणे आणि अशा विविध बाबींवर महाराष्ट्र राज्य सरकारला सल्ला देणे.