संवेदनशीलता
लैंगिक छळाच्या प्रकरणांच्या संवेदनशीलतेची जाणीव आम्हाला आहे. यासंदर्भातील सर्व तक्रारींची दखल घेत निष्पक्ष पद्धतीने तपास केला जाईल, तसेच प्रत्येक प्रकरण अधिकाधीक गोपनीयतेने हाताळले जातील.
तक्रार प्रक्रिया
तुम्ही लैंगिक छळाची कोणतीही घटना अनुभवल्यास किंवा साक्षीदार असल्यास, त्याची त्वरित तक्रार करणे आवश्यक आहे. एक साधा अर्ज भरून तुम्ही अशा घटनेची तक्रार करू शकता किंवा वरील तक्त्यामध्ये दिलेल्या संपर्क तपशीलांचा वापर करून तुम्ही संपर्क साधू शकता. मोकळेपणाने बोला आणि तुमची तक्रार गांभीर्याने घेतली जाईल याची खात्री बाळगा.