महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागांमधल्या ५१४ शाळांमध्ये डिजिटल शिक्षण पोहोचवण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून आम्ही कार्यरत आहोत. या दोन्ही जिल्ह्यांमधल्या ४७९ शाळांमध्ये डिजिटल उपक्रम राबविण्यासाठी भागीदारीच्या माध्यमातून आम्ही हे काम करत आहोत.
डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमांतर्गत उचललेल्या नाविन्यपूर्ण पावलांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने शिकता येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अध्ययन प्रक्रिया अधिक प्रभावी झाली आहे. डिजिटल माध्यमांतून प्रदान केले जाणारे शिक्षण, आधुनिक जगात उपयुक्त ठरणारी नवीन कौशल्ये आत्मसात करण्याच्या कामी सहाय्यक ठरते आहे.
या प्रकल्पाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये आभासी वर्गासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर, एलईडी टच स्क्रीन, विद्यार्थी मूल्यमापन संच, मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध डिजिटल साहित्य, विश्लेषणाची तरतूद असणारे विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन सॉफ्टवेअर, रिपोर्टिंग, ऑनलाइन डॅशबोर्ड आणि चॅटबॉट ॲप्लिकेशन यांचा समावेश आहे.
हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.