आम्ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांसाठी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्यासाठी तज्ञ तांत्रिक मनुष्यबळ पुरवतो. संस्था किंवा प्रकल्पांमध्ये विशिष्ट भूमिका पार पाडण्यासाठी विशिष्ट कौशल्ये असणाऱ्या तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचा शोध घेणे आणि योग्य प्रक्रिया राबवून पात्र व्यक्तीची नियुक्ती करणे असे या कामाचे स्वरूप आहे.
आम्ही प्रकल्पाच्या किंवा संस्थेच्या तांत्रिक गरजा समजून घेतो. त्यानंतर पदभर्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध माध्यमांद्वारे जाहिराती देणे, अर्ज मागविणे आणि कागदपत्रांची पडताळणी करत उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. विहित प्रक्रियेला अनुसरून संबंधित पदासाठी उमेदवाराची निवड केल्यानंतर त्यांना नियुक्त केले जाते. नव्याने रूजू होणाऱ्या उमेदवारांना आम्ही आवश्यक ते सर्व सहकार्य करतो. विवक्षित पदावर नेमणूक झाल्यानंतरसुद्धा संबंधित उमेदवार आणि प्रकल्प किंवा संस्था यांच्यात समन्वय राखण्याला आमचे प्राधान्य राहिले आहे.
हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.