महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क कायदा, २०१५ हा सार्वजनिक सेवा वितरण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा एक महत्वपूर्ण कायदा आहे. हा कायदा नागरिकांना राज्य शासनाकडून पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने, कालबद्धरित्या सेवा प्राप्त करण्याचा अधिकार देतो.
या कायद्यांतर्गत नागरिकांना ५०० पेक्षा जास्त सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही आपले सरकार पोर्टल आणि 'आरटीएस महाराष्ट्र' मोबाईल ॲप विकसित केले आहे. वापरकर्त्यांना हव्या असलेल्या सेवा सहजरित्या प्राप्त करण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेले ‘आपले सरकार’ पोर्टल आणि 'आरटीएस महाराष्ट्र' मोबाईल ॲप हे सोप्या प्रक्रियेमुळे नागरिकांच्या पसंतीस उतरते आहे. या मंचाच्या माध्यमातून नागरिक आपल्या हव्या असलेल्या सेवांसाठी आणि प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात, आणि आपली अर्ज प्रक्रिया आपण स्वत:च सुरळीतपणे मार्गी लावू शकतात.
सेवा प्रदान करण्याच्या प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही ‘आपले सरकार’च्या माध्यमातून नागरिकांना महाराष्ट्र सार्वजनिक सेवा कायदा, २०१५ अंतर्गत त्यांच्या अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार दिले आहेत. या डिजिटल मंचाच्या विकासाच्या माध्यमातून नागरिक-केंद्रित सेवा प्रभावीपणे प्रदान करण्याप्रति राज्य सरकारची वचनबद्धता अधोरेखित होते.
हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.