विविध विभागीय योजनांचे लाभ पात्र लाभार्थींच्या खात्यात थेट पोहोचावेत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाने थेट लाभ हस्तांतरण सेवा लागू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, आदिवासी विकास, उच्च शिक्षण संचालनालय, तंत्रशिक्षण संचालनालय, शालेय शिक्षण आणि क्रीडा संचालनालय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, कृषी अशा विविध विभागांतर्फे दिले जाणारे लाभ या योजनेच्या माध्यमातून प्रदान केले जातात.
या कामी, महाराष्ट्र राज्य शासनाच्या विभागांना माहिती तंत्रज्ञान मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही हे महाडीबीटी पोर्टल विकसित केले आहे. लाभार्थींना त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांद्वारे लाभांचे थेट हस्तांतरण करणे हा या पोर्टलचा प्राथमिक उद्देश आहे.
२०१८ साली सुरू झालेल्या या महाडीबीटी पोर्टलमध्ये सुरुवातीला ९ विभागांच्या ४५ मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना होत्या. सध्या या पोर्टलवरून ११ विभागांच्या ६६ योजनांचे लाभ प्रदान केले जातात. आतापर्यंत पाच शैक्षणिक वर्षांमध्ये लाभार्थींच्या आधार जोडणीच्या माध्यमातून या पोर्टलवर एक कोटी एकेचाळीस लाख पेक्षा जास्त पात्र लाभार्थींची यशस्वीरित्या नोंदणी आणि पडताळणी करण्यात आली आहे आणि २३,६२३ कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी वितरीत करण्यात आला आहे.
हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.