देशभरात तळागाळापर्यंत सुलभ नेटवर्क प्रदान करण्याच्या उद्देशाने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, राज्ये आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून राबविला जाणारा ‘भारतनेट’ हा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा प्रकल्प आहे. डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व घरांना आणि संस्थांना, मागणीनुसार २ Mbps ते २० Mbps क्षमतेची ब्रॉडबँड जोडणी परवडण्याजोग्या दरात प्रदान करणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आम्ही भारतनेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतींपर्यंत वाय-फाय किंवा इतर ब्रॉडबँड तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेट पोहोचविण्यासाठी कार्यरत आहोत. यामुळे ग्रामीण भागात ई-प्रशासन, ई-आरोग्य, ई-शिक्षण, ई-बँकिंग, इंटरनेट आणि इतर विविध सेवा सुलभरित्या प्रदान करणे शक्य होते आहे. अलिकडेच या प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यात आली असून ग्रामपंचायतींच्या पलीकडील सर्व वस्त्यांनाही या उपक्रमाच्या परिघात सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.